Pune Crime News | परदेशी मुलींचा वेश्याव्यवसाय खुलेआम ? मेंशन स्पा… आता व्हिक्टोरिया थाई स्पा : : आका रहीमच कनेक्शन तपासलं जाणार ?

- परदेशी मुलींच वेश्याव्यवसायच मोठं रॅकेट पुण्यात सक्रिय
पुणे, दि, २२ जुलै, महाराष्ट्र मिरर
Crime Report | Pune Crime News, Pune Spa Sex, pune news
पुण्यातील स्पाच्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहे. विमानतळ येथे एका पाठोपाठ मेंशन स्पा… आता व्हिक्टोरिया थाई स्पा कारवाई करण्यात आली आहे. यानिमित्ताने परदेशी मुलींच वेश्याव्यवसायच मोठं रॅकेट पुण्यात सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. यात सेक्स रॅकेटचा मोहरक्या आका रहिमच कनेक्शन तपासलं जाण्याची शक्यता आहे. मेंशन स्पा येथील कारवाई तब्बल १० परदेशी मुलींची सुटका करण्यात आल्यानंतर रहिमच नाव समोर येत आहे.
दि. २१/०७/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष व युनिट-४, गुन्हे शाखा पुणे शहर यांना “व्हिक्टोरिया थाई स्पा” ईडन पार्क बिल्डींग सी, ६ वा मजला, ऑफीस नंबर ६०१ विमानतळ पुणे येथे मसाज स्पा सेंटरचे नावाखाली वेश्याव्यवसाया करिता मुली ठेवून त्यांना पुरुष गि-हाईकांना मसाजच्या नावाखाली पुरवून त्यांचेकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असले बाबत खात्रीशीर बातमी गोपनिय बातमीदारामार्फत प्राप्त झाली होती. सदर बातमीची माहिती पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे, अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी वरिष्ठांना कळविली. त्यावर वरिष्ठांनी सदर बातमीची खातरजमा करुन कायदेशिर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
त्याप्रमाणे बनावट गि-हाईकास पाठवून खात्री करून छापा टाकुन दोन स्पा मॅनेजर व एक स्पा चालक मालक यांचेवर बीएनएस कलम १४३, ३ (५) व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३. ४, ५ व ७ अन्वये विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन चार परदेशी महिला व एक भारतीय महिला असे पाच पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक, श्रीमती आशालता खापरे, सपोफौ अजय राणे, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, अमेय रसाळ, ईश्वर आंधळे, म. पोलीस अंमलदार वैशाली खेडेकर, पोलीस अंमलदार अविनाश कोंडे, किशोर मुजबळ तसेच सुनिट ४ कडील पोलीस अमंलदारयांनी केली आहे.



