ठाणेमुंबई
Trending

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या कार्यक्रमासाठी मिरा रोडमध्ये वाहतूक बदल! 18 जुलैला ‘नो पार्किंग’ झोन घोषित

Raj Thackeray Mira Road Sabha : सेंट पॉल स्कूल परिसरात होणाऱ्या उद्घाटनासाठी मनसे कार्यकर्त्यांची गर्दी अपेक्षित; वाहतूक मार्गात मोठे बदल

मिरा रोड :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मिरा रोड पूर्व येथील नित्यानंद नगरमध्ये होणाऱ्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. Raj Thackeray Mira Road Sabha

कार्यक्रम दि. 18 जुलै 2028 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत पार पडणार असून, सेंट पॉल शाळेच्या आजूबाजूचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

काशिमीरा वाहतूक विभागाच्या प्रस्तावावरून आणि संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी पोलीस उपआयुक्त अशोक तानाजी विरकर यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.

प्रवेश बंद रस्ते:
1.सेंट पॉल स्कूल ते गेटवे केमिस्ट – पुनम क्लस्टर कॉम्प्लेक्स या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने बंद.
पर्यायी मार्ग: सेक्टर-5, रामनगर, शांती गार्डनमार्गे वाहने वळवण्यात येतील.

2.ओमशांती चौक ते जांगिड इस्टेट रोड – सेंट पॉल स्कूल कडे जाणारा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग: सुष्टी रोड व सुष्टी सिग्नलमार्गे वाहतूक वळवण्यात येईल.

पोलीस, अग्निशमन दल, अ‍ॅम्ब्युलन्स, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन वाहने, अधिकृत सरकारी वाहने, वसई-विरार, मिरा-भाईंदर आणि मुंबई महापालिकेच्या परवानाधारक वाहनांना ही अधिसूचना लागू राहणार नाही.मिरा रोड पूर्व परिसरात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी 18 जुलै रोजी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि वाहन पार्किंगसाठी घोषीत मार्गांवर टाळाटाळ करावी, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0