महाराष्ट्र
Trending

Mumbai Crime News : व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट डायरेक्टर बनून 1.93 कोटींची सायबर फसवणूक; सायबर गुन्हे शाखेची धडक कारवाई

Mumbai Crime News : आरोपी शस्त्र व जिवंत काडतुसांसह अटकेत; 11 सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश, परदेशी टोळीशी संपर्क उघड

मुंबई, :- कंपनीच्या कंपनी सेक्रेटरीला व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट प्रोफाईल वापरून आपल्याच कंपनीचे डायरेक्टर असल्याचे भासवत, तब्बल 1 कोटी 93 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीचा पर्दाफाश सायबर पोलीस ठाणे, पश्चिम विभाग, गुन्हे शाखा, मुंबई यांनी केला आहे. या गुन्ह्यात सहभागी 6 सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, लॅपटॉप, विविध बँकांचे चेकबुक, डेबिट कार्ड्स, आणि एक पिस्तूलसह 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. Mumbai Latest Cyber Crime News

ही धक्कादायक फसवणूक 12 एप्रिल ते 15 एप्रिल 2025 दरम्यान घडली. आरोपीने मोबाईल वरून कंपनी सेक्रेटरीशी व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क साधून, आपण कंपनीचा डायरेक्टर असल्याचे भासवले व SBI बँकेतील कंपनीच्या खात्यातून ICICI बँकेत 1 कोटी 93 लाख 6 हजार रुपये वळते केले.

अटक आरोपींची नावे व सहभाग

1.शुभम बाजीराव कुंजीर (28 वय, पुणे) – बेनिफिशरी खातेधारक
2.अक्षय गोरख शेळके (28 वय, नाशिक) – फसवणूक रचनेत सहभाग
3.उज्ज्वल सिंह (29वय, अंधेरी, मुंबई) – खातेधारक पुरवठादार
4.शुभमकुमार परदेशी उर्फ राजपूत (28 वय, नाशिक) – आरोपींची राहण्याची व बँक किट गोळा करण्याची जबाबदारी
5.आदित्य दिलीप शिंदे उर्फ लुसिफर (31वय, कोलवा, गोवा) – माहिती संकलन व वितरण
6.आयरन शिवपाल मिश्रा उर्फ सिंचन नोहरा उर्फ आरू (33 वय, लखनऊ, उत्तर प्रदेश) – OTP,
इंटरनेट बँकिंग माहिती परदेशी टोळीला पाठवणारा, USDT क्रिप्टोमध्ये रक्कम रूपांतर करणारा आहे.

जप्त मुद्देमाल
28 मोबाईल फोन, 16 सिमकार्ड्स, 13 चेकबुक्स, 8 डेबिट कार्ड्स, 1 लॅपटॉप

1 पिस्तूल व 4 जिवंत काडतुसे

गुन्ह्याच्या तपासात असे निष्पन्न झाले की अटक आरोपी शुभम कुंजीरच्या नावावर असलेल्या ICICI बँक खात्यावर आधीच 11 सायबर फसवणूक प्रकरणांची तक्रार National Cyber Crime Reporting Portal वर नोंदवली आहे, व त्यामार्फत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.

Indian Police Service (IPS) officer Deven Bharti is appointed as the new commissioner of Mumbai police

पोलीस पथक

देवेन भारती, पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, मुंबई ,लखमी गौतम, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) कार्यवाहीला गती,शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),पुरुषोत्तम कराड, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे रणनीती ठरवण्यात पुढाकार,राजेंद्र शिरतोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर विभाग ,सुवर्णा शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे (पश्चिम विभाग) – यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता माळी,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गच्चे, पोलीस शिपाई विष्णू काळे, संग्राम जाधव, प्रविण चाळके, मयूर इंगळे, अनिल वारे, सुयेश लोकरें यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0