क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune News : गांधी पुतळ्यावर कोयत्याने हल्ला! पुणे स्थानकाबाहेर संतापजनक प्रकार

Pune Latest Crime News : माथेफिरूचा विकृत आकस? रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान राखून अनर्थ टाळला

पुणे – शहरातील मध्यवर्ती पुणे रेल्वे स्थानकाबाहेर रविवारी रात्री घडलेला प्रकार थरकाप उडवणारा ठरला. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर एका तरुणाने कोयत्याने हल्ला चढवत धक्कादायक कृत्य केले. या विकृत प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. Pune Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज शुक्ला (वय अंदाजे ३०), हा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी असून पुण्यात धार्मिक वस्तू विकण्याचं काम करतो. तो केशरी कुर्ता घालून रेल्वे स्थानकाच्या परिसरात आला आणि थेट गांधी पुतळ्याच्या चौथऱ्यावर चढून कोयत्याने पुतळ्यावर वार करू लागला. छाती व पायाच्या भागावर हल्ला झाल्याची नोंद असून, डोक्यावर हल्ला करण्याच्या आधीच रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

सुरजच्या कृतीमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र पोलिसांनी सुरू केलेल्या प्राथमिक तपासात, त्याच्या मनात गांधीजींविषयी पूर्वग्रहदूषित राग असल्याचं संकेत मिळाले आहेत. तो कोणत्याही संघटनेशी संबंधित आहे का, याची चौकशी सुरू आहे. सुरजला न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

हा प्रकार घडताना परिसरात प्रवाशांची गर्दी होती. प्रसंगावधान राखून रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप न केला असता, पुतळ्याचे मोठे नुकसान झालं असतं, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0