क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Drugs News : 75 लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Thane Latest Drug News : राजस्थानहून विक्रीसाठी आणलेला 501 ग्रॅम अंमली पदार्थ ठाण्यात जप्त,गुन्हे शाखा, ठाण्याची मोठी कारवाई; दोन आरोपींना अटक, तपास सुरू

ठाणे : – राजस्थान राज्यातून छुप्या मार्गाने विक्रीसाठी आणलेला सुमारे 75 लाख रुपयांचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ ठाणे गुन्हे शाखा, घटक-1 Thane Crime Branch Unit 1 ने जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. Thane Police Latest Crime News

गुन्हे शाखा, घटक-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना 9 सप्टेंबर 2025 रोजी गुप्त माहिती मिळाली की, एक इसम राजस्थानहून एम.डी. क्रिस्टल पावडर घेऊन मुंबईकडे येत आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, खारीगाव टोलनाक्याजवळ सापळा रचण्यात आला. Thane Police Latest News

सायंकाळीच्या दरम्यान, हुंडाई आय 20 (क्र. MP-09-DC-2908) ही संशयित गाडी टोलनाक्यावर येताच पोलिसांनी ती अडवली. गाडीतील आरोपी सुरेशसिंह गंगासिंह तंवर (वय 35, रा. मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. गाडीची आणि आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 501.50 ग्रॅम वजनाची एम.डी. क्रिस्टल पावडर आढळून आली, ज्याची बाजारात किंमत सुमारे 75 लाख 22 हजार 500 रुपये आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात आरोपी सुरेशसिंह तंवर याने त्याचे साथीदार कुलदीपसिंह परिहार आणि अभिषेक जैस्वाल यांच्यासोबत हा अंमली पदार्थ ठाण्यात विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून कुलदीपसिंह परिहार याला 12 सप्टेंबर रोजी अटक केली. हे आरोपी मूळचे मध्यप्रदेशचे असून, त्यांनी हा अंमली पदार्थ राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील गावांतून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे हे करत आहेत. अटक आरोपींची पोलीस कोठडी 20 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे, रवींद्र पाटील तसेच इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0