मुंबई

Mumbai News : जर्मनीहून परतलेल्या 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या; 45 व्या मजल्यावरून घेतली उडी

•अंधेरीतील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा अनंत द्विवेदी याने ओबेरॉय ई-स्क्वेअर इमारतीतून जीवनयात्रा संपवली

मुंबई | गोरेगावमधील उंच इमारतीच्या 45 व्या मजल्यावरून उडी मारून अनंत द्विवेदी (वय 22) या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. अनंत हा अंधेरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असून तो जर्मनीमध्ये अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत द्विवेदी मंगळवारी सकाळी रिक्षाने गोरेगाव येथील ओबेरॉय ई स्क्वेअर इमारतीसमोर आला. त्यावेळी सुटे पैसे नसल्याने, “5 मिनिटात पैसे घेऊन येतो,” असे सांगून तो इमारतीत गेला. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही परत न आल्याने रिक्षाचालकाने गोंधळून पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच त्याने 45 व्या मजल्यावरून उडी मारल्याचे उघड झाले.

घटनास्थळी त्याचा गुगल पिक्सेल स्मार्टफोन सापडला, मात्र त्यात कोणतीही सुसाईड नोट नव्हती. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

अनंत द्विवेदी सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या विमानाने जर्मनीला परत जाणार होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याला विमानतळावर निरोप दिला होता. त्यानंतर अनंतने त्यांना फोन करून “मी विमानात बसलोय,” अशी माहिती दिली होती. मात्र खरेतर तो विमानात गेलेलाच नव्हता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो दुसऱ्या दिवशी थेट गोरेगावच्या ओबेरॉय ई-स्क्वेअर इमारतीत गेला, जिथे त्याच्या कुटुंबाची एक सदनिका आहे. ही इमारत त्यांच्याकडून अधूनमधून राहण्यासाठी वापरली जाते.

पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले की, “आम्ही आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0