मुंबई

Mumbai Crime News : 24 कोटींचा बँक अपहार उघड! तत्कालीन अध्यक्षासह 12 जणांवर गुन्हा दाखल

•कर्ज माफीतून घोटाळा; सहा कोटींची रक्कम खासगी कंपनीत वळती

मुंबई | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आणखी एक पर्दाफाश झाला आहे. तब्बल 24 कोटी 93 लाख रुपयांच्या कर्ज अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, कर्ज अधिकारी आणि दोन कंपन्यांचे संचालक अशा 12 जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तपासात उघड झाले आहे की, संशयितांनी बँकेतील कर्ज खातं बुडीत घोषित करून संबंधित कंपनीला १८ कोटी ५६ लाख रुपयांची कर्ज व व्याजमाफी दिली. यानंतर त्या कंपनीच्या खात्यातून तब्बल सहा कोटी ३७ लाखांची रक्कम स्वतःच्या मालकीच्या कंपनीत वळती करण्यात आली. ही रक्कम कर्जाच्या स्वरूपात मंजूर झाली नसतानाही तिचा वापर केला गेला, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गुन्हा भारतीय दंड विधानाच्या कलम 406,409,418 आणि 120(ब) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयितांमध्ये मृत अध्यक्ष रणजीत भानु, त्यांचे कुटुंबीय हिरन आणि गौरी भानु, तसेच कर्ज मंजूर करणारे अधिकारी व कंपनी संचालकांचा समावेश आहे.

याआधीही या बँकेच्या प्रभादेवी व गोरेगाव शाखांमधून 122 कोटींच्या तिजोरीतील अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या तपासादरम्यान बँकेतील बुडीत कर्ज प्रकरणांची चौकशी करताना हा नवा घोटाळा उजेडात आला. याच पार्श्वभूमीवर 2010 पासूनच्या बुडीत कर्ज प्रकरणांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करीत असून, हे संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर व गुंतागुंतीचे असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0