मुंबई

Vasai Bribe News : महावितरणचा ‘खिसेकाटू’ अधिकारी अखेर सापळ्यात! 30 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

•”2 लाखांचं थकीत बिल 60 हजारात उरकतो, पण तुमचं मला 30 हजार द्यायचं!” – उपव्यवस्थापकाचा सौदाबाजार उघड

वसई, पालघर | पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व येथे कार्यरत असलेल्या महावितरणच्या उपव्यवस्थापकाचा भ्रष्टाचाराचा बुरखा अखेर फाडला गेला. कल्पेश जयवंत पाटील (वय 53), पद – उपव्यवस्थापक वित्त व लेखा) यांनी 30 हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकले.

प्रकरण धक्कादायक आहे. तक्रारदार यांच्या कुटुंबाच्या नावावर 2010 पासून बंद असलेले विजेचे मीटर होते. या मीटरवर थकबाकी दाखवण्यात आली होती संपूर्ण 2 लाख 6 हजार 920 रुपये. परंतु सदर रक्कमेतून “डील” करून, केवळ 60 हजार रुपये भरून बिल मिटवतो,” अशी लालसेची ऑफर उपव्यवस्थापक पाटील यांनी दिली. मात्र त्या बदल्यात त्यांनी स्वतःसाठी 30 हजारांची लाच मागितली.

तक्रारदाराने ही माहिती 9 जून 2028 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. लगेचच पडताळणी करून, सापळा रचण्यात आला. अगदी फिल्मी थरारासारखी ही कारवाई होती – तक्रारदाराने नोटांची बॅग पाटील यांच्याकडे दिली, आणि त्या क्षणी अ‍ॅन्टी करप्शन टीमने धाव घेत पाटील यांना रंगेहात पकडले.सदर कारवाई माणिकपूर पोलीस स्टेशन, वसई येथे गुन्हा भ्रष्टाचार अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही धडक मोहीम पोलिस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सुहास शिंदे, संजय गोविलकर यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस निरीक्षक सचिन मोरे (ACB, ठाणे) यांच्या पथकाने यशस्वी कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0