पुणे

Supriya Sule : ठाकरे बंधूंना एकत्र येण्यास सुप्रिया सुळेंचा पाठिंबा!“दोघे एकत्र आले, तर महाराष्ट्रासाठी आनंदाचा क्षण ठरेल”

ठाकरे कुटुंब म्हणजे बाळासाहेबांची मोठी विरासत – सुप्रिया सुळे

पुणे :- ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील सुलह आणि संभाव्य युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात वेग मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. “ठाकरे कुटुंब एक आहे, आणि ते बाळासाहेब ठाकरे यांच्या अफाट वारशाचे खरे वारसदार आहेत. ते एकत्र आले, तर ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल,” असे सुळे यांनी म्हटले.

त्याचबरोबर सुळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची आठवण करून दिली. “बाळासाहेबांनी शून्यातून सुरुवात करून शिवसेनेचा भक्कम किल्ला उभारला. ही प्रेरणा आणि ही शिवसेनेची मूळ ओळख आज उद्धव आणि राज यांनी पुढे नेली आहे. आता जर ते दोघे एकत्र येत असतील, तर शिवसेनेला पुन्हा एक नवी ताकद मिळेल,” असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी सुचक विधान करत म्हटले होते की, “गठबंधन बातम्यांमध्ये बोलून होत नाही, दोघांनी थेट एकमेकांशी बोलणे गरजेचे आहे.” त्यांच्या मते, कोरोना काळात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाचे समर्थन केले होते, त्यामुळे संवाद शक्य आहे. आता दोघांच्याही हालचालींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0