नाशिक

Nashik News : “सावरकरांचा अपमान सहन करणार नाही!” — दराडेंची राहुल गांधींना धमकी, महाविकास आघाडीत भूकंप

“चेहऱ्यावर काळं फासू, ताफ्यावर दगडफेक करू” — नाशिकमध्ये दराडेंची वादग्रस्त घोषणा

नाशिक – वीर सावरकरांवरील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये ठिणग्या पडल्या आहेत. नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे) शहर उपाध्यक्ष बाळा दराडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं, “राहुल गांधी नाशिकमध्ये आले, तर त्यांच्या चेहऱ्यावर काळं फासू. हे शक्य नसलं तर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू.”

ही धमकी त्यांनी सावरकर जयंती निमित्त बोलताना दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं,”सावरकरांविषयी अपशब्द सहन केला जाणार नाही, मग त्यासाठी महाविकास आघाडीचा बळी गेला तरी चालेल.”दराडेंच्या वक्तव्यावरुन सत्ताधारी आघाडीत फूट पडण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

“धमकीचं राजकारण बंद करा” — काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया, आघाडीत तणाव

दराडेंच्या विधानावर पक्ष प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत म्हटलं, “ही पक्षाची भूमिका नाही, ही दराडे यांची वैयक्तिक भावना आहे.”

तथापि, काँग्रेसने या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं, “राहुल गांधींचे वडील राजीव गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं. आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरणारे नाही.”

दराडेंनी केलेल्या वक्तव्यामुळे एकीकडे सावरकरप्रेमींमध्ये उत्साह दिसून आला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील विश्वासाला तडे गेले आहेत. पुढील काळात या प्रकरणाचे राजकीय पडसाद किती खोलवर उमटतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0