महाराष्ट्र

Loksabha Election List : एमआयएम चा महाराष्ट्राचा फॉर्म्युला ठरला इतक्या जागा लढू शकतात

एम आय एम महाराष्ट्रात सहा जागा लढवणार ; खासदार इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर :- लोकसभेचा बिबुल वाजला असून उद्या निवडणूक आयोग लोकसभेच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली असून या पत्रकार परिषदेत लोकसभेच्या निवडणुका जागा जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. Loksabha Election List

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये सध्या जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाली. त्यानंतर महाविकास आघडीतही बैठकांचे सत्र सुरू असून लवकरच मविआची यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे. Loksabha Election List

लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. एमआयएम महाराष्ट्रात 6 जागा लढवणार आहे अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. सर्व पक्षांचे जागावाटप जाहीर झाल्यावर आम्ही निर्णय जाहीर करू दरम्यान, या सहा जागांमध्ये मराठवाड्यातील दोन छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड, विदर्भातील दोन, मुंबईतील एक तर उत्तर महाराष्ट्रातील एक अशा जागांचा समावेश आहे. मात्र सर्व राजकीय पक्षांचे जागावाटप जाहीर झाल्यानंतरच एमआयएम जागावाटपाचा निर्णय जाहीर जाणार आहे, असे इम्तियाज जलील म्हणाले. Loksabha Election List

आपल्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईचे पर्याय खुले आहेत असेही जलील यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्राबाबत आतापर्यंत 6 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापेक्षा जास्त जागाही असू शकतात. कारण दररोज राज्याच्या राजकारणात अनेक घडामोड घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा सर्व पक्षांच्या याद्या जाहीर होतील, तेव्हा कुठे ना कुठे नाराजीचा सूर पाहायला नक्कीच मिळेल. आता इतर पक्ष जसजसे आपले पत्ते उघडतील, त्यानंतर आम्ही आमचे पत्त ओपन करू”, असे जलील म्हणाले. Loksabha Election List

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0