महाराष्ट्र

Yogesh Kadam : महाराष्ट्र दिनानिमित्त खेडमध्ये ध्वजारोहण; गृह राज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले?

महाराष्ट्र दिनानिमित्त खेड येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रत्नागिरी :- दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त खेड येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी त्यांनी उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि प्रशासकीय प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

ध्वजारोहण समारंभानंतर मंत्री योगेश कदम यांनी खेड येथील स्थानिक पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यातील विविध विभागांची पाहणी केली.त्यांनी विशेषतः सायबर सेल आणि स्वच्छता व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी कामकाज, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि तक्रारींचे निवारण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या या भेटीमुळे स्थानिक प्रशासनाला सकारात्मक चालना मिळाली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेप्रती सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0