Mumbai CP : मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त कोण होणार? ही नावे आहेत चर्चेत!

•मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त Mumbai CP कोण होणार? याची आता चर्चा सुरू झाली आहे. कारण विद्यमान आयुक्त विवेक फणसळकर हे या महिन्याच्या शेवटी निवृत्त होत आहेत. यामुळे मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे
महाराष्ट्र मिरर विवेक राजेंद्र जगताप 16 एप्रिल 2025 मुंबई :- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या देशासह राज्याचे केंद्रबिंदू असलेले मुंबईचे पुढचे पोलिस आयुक्त Mumbai CP कोण असतील? मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर एप्रिल अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वर्णी लावण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.जर राज्य सरकारने विवेक फणसाळकर Vivek Phansalkar यांना मुदतवाढ दिली नाही,गेल्या 30 जून 2022 रोजी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीला फक्त 18 दिवस उरले आहेत. त्यासाठी आता आयपीएस अधिकारी संजयकुमार वर्मा यांचे नाव सर्वात पुढे आहे. ते एप्रिल 2028 मध्ये निवृत्त होणार आहेत. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदावरून हटवून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
तर 1 मे रोजी मुंबईला नवीन पोलिस आयुक्त मिळेल Mumbai CP . विवेक फणसळकर 1 जुलै 2022 रोजी मुंबई पोलिस आयुक्त झाले. फणसळकर यांच्यापूर्वी संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, गतिमान आयपीएस अर्चना त्यागी देखील मुंबई पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत. अर्चना त्यागी या महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस आहेत. त्या 1993 च्या बॅचच्या अधिकारी आहेत.1990 बॅचचे आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि बिपिन कुमार सिंह हे देखील आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत. सध्या हे सर्व आयपीएस अधिकारी डीजी रँकचे आहेत. याशिवाय देवेन भारती यांचे नावही चर्चेत आहे.
विवेक फणसळकर कोण आहे?
विवेक फणसळकर Vivek Phansalkar मुळचे पुण्याचे असून त्यांना त्यांचे शिक्षण देखील पुण्यात पूर्ण केलंय. बी ई इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकाॅम असलेले विवेक फणसाळकर यांनी एमआयटी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये टेल्कोचे लेक्चरर म्हणून करीअरची सुरुवात केली होती. हे करत असताना त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली आणि 1989 मध्ये महाराष्ट्र कॅडरमधून विवेक फणसळकर यांची निवड झाली.विवेक फणसाळकर हे 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी असून अकोला येथे अतिरिक्त पोलीस अधिक्षक पदी त्यांची पहिली वर्णी लागली होती. त्यानंतर राज्यपाल डाॅक्टर पीसी असेक्झांडर यांचे एडीसी म्हणुन विवेक फणसाळकर यांनी काम पाहलंय. वर्ध्याचे पोलीस अधिक्षक, बोसनिया येथे यु एस मिशन करता त्यांची निवड झाली होती. विवेक फणसाळकर यांनी पोलीस उपायुक्त नाशिक, पोलीस अधिक्षक सीआयडी क्राईम नागपूर, फायनान्स आणि कंपणी अफेअर्स मंत्रालयात ज्वाईंट डायरेक्टर पदावर काम पाहलंय. टेक्सटाईल मंत्रालयात विजीलंस डायरेक्टर, अतिरिक्त पोलीस आयुक्त ठाणे आणि पुणे पदी देखील विवेक फणसाळकर यांनी काम पाहलंय मुंबई वाहतूक पोलीस दलात सह पोलीस आयुक्तपदी देखील त्यांनी उत्तम कामगिरी केलीय. त्यानंतर सह पोलीस आयुक्त प्रशासन मुंबई पोलीस, अतिरिक्त पोलीस महासंचालक दहशतवादी विरोधी पथक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असा प्रवास करत विवेक फणसाळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार उत्तमरित्या पूर्ण केला.



