Vasai Crime News : पेल्हार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ; सांबर या वन्य प्राण्याचे शिंग विक्री 2 आरोपीला अटक
पेल्हार पोलिसांनी, 02 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 60 लाख रुपये किंमतीचे सांबर या वन्य प्राण्याचे दोन शिंग जप्त
वसई :- पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत (12 मार्च ) ॲपल इंन्डस्ट्री, पेल्हार नालासोपारा पूर्व येथे दोन व्यक्तींना त्यांचे कब्ज़ात विना परवाना बेकायदेशिर रित्या काळविट या वन्य प्राण्याच्या शिंगाची विक्री करण्याकरीता येणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना मिळाली होती. त्यांनी सदरबाबत पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना माहिती दिली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सदर बाबत खात्री करुन कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. Vasai Crime News
आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोउपनिरी तुकाराम भोपळे, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी ॲपल इंन्डस्ट्री, पेल्हार नालासोपारा पूर्व ता. वसई जि.पालघर येथे सापळा रचून काळविट या वन्य प्राण्याच्या शिंगाची विक्री करण्यास आलेल्या आरोपी 1) मोहम्मद इम्रान फरियादअली शाह, (42 वर्षे), रा. वसई पश्चिम ता. वसई जि. पालघर, 2) अशोक विरजीभाई पटेल, (58 वर्षे) रा. वसई पूर्व, ता. वसई जि. पालघर यांना ताब्यात घेऊन त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात असलेल्या बजाज कंपनीची रिक्षात काळविट या वन्य प्राण्याचे 50 लाख रुपये किंमतीचे एक शिंग मिळून आले असून त्यांच्या ताब्यातुन एक बजाज कंपनीची रिक्षा, व दोन मोबाईल फोन असा एकुण 51 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असुन तो जप्त करण्यात आला आहे. Vasai Crime News
आरोपीत यांच्या ताब्यात मिळुन आलेले शिंग हे नक्की कोणत्या प्राण्याचे आहे याबाबत वैद्यकीय अधिकारी , पशु चिकीत्सक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली पूर्व मुंबई यांच्याकडून लेखी अभिप्राय घेण्यात आला असून त्यांनी सदरचे शिंग हे सांबर हया वन्य प्राण्याचे असल्याबाबत अहवाल दिला आहे. सदरचे शिंग हे सांबर या वन्य प्राण्याचे असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्याने आरोपी यांच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाणे येथे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,44,48,सह भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (ड), 26 (1) (आय) 65 अन्वये दिनांक 12 मार्च 2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक आरोपीत क्र. 01 याच्याकडुन सदर गुन्हयाचे तपासात 13 मार्च 2024 रोजी 10 लाख रुपये किंमतीचे आणखी एक शिंग जप्त करण्यात आले असुन सदर गुन्हयाचा तपास सुरु आहे. Vasai Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त,श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त , विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पेल्हार पोलीस ठाणे, व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, पोलीस अंमलदार वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, संजय मासाळ, रवि वानखेडे, किरण आव्हाड, निखील मंडलिक, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Vasai Crime News