मुंबई

Human Trafficking Police Station : नव्याने अनैतिक मानवी वाहतूक पोलीस ठाण्याची निर्मिती, मिरा-भाईंदर या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

•Creation of a new Immoral Human Trafficking Police Station मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील मीरा-भाईंदर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक या नव्या पोलीस ठाण्याचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मिरा रोड :- मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील मीरा भाईंदर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महायुती सरकारला शंभर दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्याने शंभर दिवसाच्या या विकास कामाच्या कृती आराखड्याच्या धोरणानुसार या कार्यालयाचे स्थलांतर करून नव्याने उद्घाटन करण्यात आले आहे.

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा मीरा-भाईंदर हे कार्यालय यापूर्वी मॅक्सेस मॉल जवळ भाईंदर पश्चिम येथे होते. परंतु मेट्रोच्या कामामुळे या कार्यालयाचे इमारत तोडण्यात आली आणि तात्पुरते कंटेनरमध्ये हे कार्यालय चालू होते. परंतु महायुती सरकारच्या 100 दिवसाच्या विकास आराखड्याच्या धोरणानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष हे कार्यालय काशिगाव पोलीस ठाणे विनय नगर मिरा रोड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या नवीन इमारतीचे उद्घाटन पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पोलीस उप आयुक्त अविनाश अंबुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पोलीस निरीक्षक अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष मिरा- भाईंदर यांच्या उपस्थितीत 26 मार्च रोजी संपन्न झाले आहे.

नवीन कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम यशस्वी होणेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, उमेश पाटील, अनिल पवार, सहाय्यक फौजदार राजु भोईर, रामचंद्र पाटील, राजाराम आसावले, शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, सम्राट गावडे, चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे, महिला पोलीस हवालदार निशीगंधा मांजरेकर, अश्विनी भिलारे, महिला पोलीस शिपाई तृषा कटकधोंड यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0