क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर छेडछाड अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक

Navi Mumbai APMC Police Latest News : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई पोलिसांचे एपीएमसी पोलिसांकडून दमदार कामगिरी, अल्पवयीन मुलीच्या छेडछाड आणि विनयभंग प्रकरणी एका आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

नवी मुंबई :- राज्यात स्वारगेट प्रकरणानंतर खळबळ उडाली असता नवी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. Navi Mumbai Police News जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई पोलिसांच्या एपीएमसी पोलिसांकडून Navi Mumbai APMC Police एक छेडछाड आणि विनयभंग प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एपीएमसी पोलीस ठाण्यात सहा मार्च रोजी एका लहान मुलीच्या छेडछाड आणि विनयभंग प्रकरणाबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर आरोपीच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 74, 75 (1)(i) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमन 2012 चे पॉक्सो(POCSO) कलम कलमांतर्गत पोलिसांनी एका 34 वर्षी आरोपीला अटक केली आहे. विनोद कुमार केदारनाथ पांडे (34 वय रा. भाजी मार्केट एपीएमसी नवी मुंबई मु.रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हयाचे तपासा दरम्यान तक्रारदार यांची फिर्याद नोंदविणे, साक्षीदारांचे जबाब नोंदविणे, पिडीत मुलीना न्यायालया समक्ष जबाब नोंदविणे, वैदयकीय तपासणी करणे, गुन्हयाच्या घटनास्थळाचा पंचनामा, गुन्हयाचे घटनास्थळावरील तांत्रीक तपास करून, आरोपीच्या अटकेची कारवाई, आरोपीची वैदयकीय तपासणी, इत्यादी कार्यवाही विहीत वेळेत पूर्ण करून तंत्रज्ञानाच्या मदतीने महत्वाच्या घटनाक्रमांचे चित्रीकरण करुन, पुरावे गोळा करणे, पिडीत मुलीस शासकीय नियमानुसार मदत मिळावी म्हणून मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधीतांना अहवाल पाठविणे, या व इतर महत्वाच्या अनेक बाबी लक्षणीय वेळेत पूर्ण करुन गुन्हयांचा तपास पूर्ण करुन आरोपी विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन त्याचेविरुध्द विशेष सत्र न्यायालय, बेलापूर यांचेकडे गुन्हयाचे दोषारोप पत्रासह आरोपीस केवळ 18 तासांच्या आत हजर केले आहे.एपीएमसी पोलीस ठाणेकडून अत्यंत वेगवान तपास करून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी व पिडीत महिलांना जलद गतीने न्याय मिळावा याबाबतची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा यासाठी न्यायालयास विनंती करण्यात आली आहे.

Milind Bharambe, police commissioner,
Milind Bharambe, police commissioner,

पोलीस पथक

पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, मा. पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-1 पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाशी विभाग आदिनाथ बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे, पोलीस निरीक्षक महेश मांडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय उपाळे, प्रणिता भाकरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0