Navi Mumbai Crime News : नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने जवळपास 18 ग्रॅम वजनाचे 5.40 लाख रुपयांचे अंमली पदार्थ (हेरॉईन )जप्त केले आहेत

अंमली पदार्थाचा रिल इंस्टाग्रामवर व्हायरल करणा-या चार आरोंपीना अटक
नवी मुंबई :- अंमली पदार्थाचे सेवन करून इंस्टाग्राम सोशल मिडीयावरती अंमली पदार्थाबाबत प्रोत्साहनपर व्हिडीओ व्हायरल केला होता. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून 18 ग्रॅम 5.40 लाखांचे हेरॉईन अमली पदार्थ जप्त केला आहे. चारी आरोपींच्या विरोधात येणार आहे सागरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
भाऊसाहेब ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा यांनी नवी मुंबई यांनी अंमली पदार्थ मुक्त करण्याचे व त्याचा व्यापार करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे त्यांचा पथकाने माहिती मिळाली होती की,पंचशिल नगर, बेलापुर येथे अंमली पदार्थाची विक्री करण्याकरता येणार आहेत. पोलिसांनी सापळा रचून चारी आरोपींना ताब्यात घेतले आहे तसेच त्यांच्या जवळून 18 ग्रॅम वजनाचे 5.40 लाखांचे हेरॉईन अंमली पदार्थही जप्त केले आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक आरोपींची नावे
1.संतोष दिनेश कांबळे (वय 22)
2.सलमान सलिम दौला (वय 29)
3.सनी दिनेश कांबळे (वय 24)
4.अल्पवयीन आरोप
पोलीस पथक
मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, श्री. संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या सहाय्यक पोलीस आयुक्त, भाऊसाहेब ढोले, आर्थिक गुन्हे शाखा गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, सुरज गोरे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर, पदु दारे, उत्तम लांखडे, पोलीस नाईक अंकुश म्हात्रे, संजय फुलकर, महेंद्र अहिरे, महिला पोलीस नाईक हेमांगी पाटील, पोलीस शिपाई परमेश्वर भाबड हे सहभागी होते.