बीड : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर,9 हजार रुपयांची लाच घेताना अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि शिपाई झाले गजाआड

Beed Bribe News : सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड येथून एकाचदिवशी तीन लाचखोर सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना लाच घेताना अटक
बीड :- राज्यात संतोष देशमुख हत्या Santosh Deshmukh Murder प्रकरण धनंजय मुंडे यांचा राजीनामा वाल्मीक कराड यांची अटक हे संपूर्ण चक्रव्यू बीडच्या अवतीभवती फिरत असताना बीडमधून पुन्हा एकदा एक खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांना गजाआड केले आहे. Beed Bribe News नऊ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग बीड येथील अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि शिपाई यांना एसीबीने बेड्या ठोकल्या आहे. तक्रारदार यांच्या आईच्या नावे असलेल्या इमारतीचे भाडे मूल्यांकन अहवाल प्रमाणपत्र देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच मागितली होती. अर्जुन अश्रुबा राख (55 वय) शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड, रोहित बाबासाहेब गिरी (24 वय) कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड, शेख रफिक इस्माईल (48 वय) शिपाई, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड असे ताब्यात घेण्यात आलेल्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांचे नावे आहे.
तक्रारदार यांचे आईचे नावे असलेले घर हे भाडेतत्त्वावर वनपरिक्षेत्र अधिकारी पाटोदा यांना देण्यात येणाऱ्या इमारतीचे भाडे पुनर्मूल्यांकन करण्याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी पाटोदा यांनी पत्राद्वारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांना कळविले होते .त्या अनुषंगाने इमारतीचे भाडे मूल्यांकन अहवाल प्रमाणपत्र देण्याकरिता आरोपी अभियंता राख व कनिष्ठ अभियंता गिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केली होती.
तक्रारदार यांनी दिनांक 3 मार्च 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड येथे समक्ष हजर राहून तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने आरोपी अभियंता राख यांच्याकडे तक्रारदार व पंच क्रमांक 01 यांना पाठवून लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी राख यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतः करिता दोन हजार रुपये व आरोपी गिरी यांचे करिता तीन हजार रुपये लाच मागणी केली होती. तसेच 4 मार्च रोजी आरोपी गिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे फोनवर स्वतः करिता लाच मागणी करून काल (5 मार्च) रोजी सकाळी त्यांचे कार्यालयास भेटण्यास बोलाविले होते. गिरी यांनी लाच मागणी पडताळणी दरम्यान त्यांचे वरिष्ठा करित 9 हजार रुपये पंच क्रमांक 01 यांचे समक्ष लाच मागणी केली .
काल (5 मार्च) तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम 9000 रुपये त्यांचे कार्यालयात आरोपी कनिष्ठ अभियंता गिरी यांनी आरोपी शिपाई शेख यांच्याकडे लाच रक्कम देण्यास सांगितले. त्यावरून तक्रारदार यांनी पंचा समक्ष आरोपी शिपाई शेख यांना लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

एसीबी पथक
संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव,अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीड पर्यवेक्षक अधिकारी शंकर शिंदे सापळा अधिकारी किरण बगाटे, पोलिस निरीक्षक. ला. प्र. वी. बीड सापळा पथक पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, , सहाय्यक फौजदार सुरेश सांगळे , हनुमान गोरे , संतोष राठोड, अमोल खरसाडे, चालक अंबादास पुरी यांनी कारवाई केली आहे.