Jalna Bribe News : जमिनीचे फेर घेण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणारा ग्राम महसूल अधिकारी आणि खाजगी ‘एसीबी’च्या जाळ्यात

Jalna ACB Trap News : जालनाच्या भोकरदन येथील पारध ग्राम महसूल अधिकारी आणि खाजगी व्यक्ती यांना 2.5 हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
जालना :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील महसूल विभागात लाचखोरी वाढत चालल्याचे एसीबी
च्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) कारवाईतून स्पष्ट झाले आहे. Jalna ACB Trap News एसीबीने रचलेल्या ट्रॅप मध्ये भोकरदन येथील पारध ग्राम महसूल अधिकारी आणि खाजगी व्यक्ती यांना लाच प्रकरणी ताब्यात घेण्यात आली आहे.
एका प्रकरणात तक्रारदार यांच्या पारध येथे आईने खरेदी केलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी अर्ज केला होता त्यासाठी ग्राम महसूल अधिकारी अभय मधुकरराव कुलकर्णी (वय 48) आणि कृष्णा गणेश दळवी (वय 36) यांना 2.5 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.
एसीबीने दिलेला माहितीनुसार,यातील तक्रारदार यांची आई यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी अर्ज केला होता . त्यासाठी (तीन हजार) लाच मागणी केली. तक्रारदार यांनी आज (24 फेब्रुवारी ) रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकास पारध येथे लिखित तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पारध येथे आरोपीचे कार्यालयात पडताळणी केली असता, खाजगी कृष्णा दळवी यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ग्राम महसूल अधिकारी कुलकर्णी यांच्या साठी तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी काही कमी करा म्हणुन विनंती केली असता खाजगी व्यक्ती कृष्णा दळवी यांनी तक्रारदार यांना कुलकर्णी याचे कडे पाठवले असता, आलोसे कुलकर्णी यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष तीन हजार रुपयांची स्वतः करिता लाचेची मागणी केली. तडजोडी अंती अडीच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
यातील आरोपी कुलकर्णी याने आज तक्रारदार यांचेकडून अडीच हजार रुपये स्वतःचे कार्यालयात आरोपी दळवी याचे हस्ते स्वीकारले असता आरोपी दळवी याला लाचेचे रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. फरार ग्राम महसूल अधिकारी यांचा एसीबीकडून शोध घेतला जात असून खाजगी व्यक्ती दळवी यांना अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्याकडील मोबाईल ही पोलिसांनी जप्त केले आहे.

एसीबी पथक
संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर,परिक्षेत्र छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव,अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी -पोलिस उप अधीक्षक बी एम जाधवर सापळा पथक पोलिस अंमलदार भालचंद्र बिनोरकर, गणेश चेके, अशोक राऊत यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे तर दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.