Mumbai Crime News : परिमंडळ-4 अंतर्गत पोलीस ठाण्यातील फरार, स्टॅंडिंग वॉरंट जारी असलेला आरोपींना अखेर जेरबंद

•आरोपी हबीबुल भोलु इमाम बक्श शेख उर्फ भुल्लू हा गेल्या वीस वर्षापासून फरार होता. आरोपी पोलिसांच्या हातात लागत नव्हता.
मुंबई :- आरोपी कितीही हुशार असला तरी तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाही. उशिरा का होईना परंतु, तो कायद्याचा सापड्यात सापडतोच. मुंबईच्या परिमंडळ-4 कार्यक्षेत्रातील र.अ.कि. मार्ग, पोलीस ठाणे आणि ॲन्टॉपहिल पोलीस ठाणे पोलीस ठाण्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
र.अ.कि. मार्ग, पोलीस ठाणे येथे 2003 कलम 457, 380, 34 भादवि 2005 मधील अटक आरोपी हबीबुल भोलु इमाम बक्श शेख उर्फ भुल्लू, हा मा. 13 वे न्यायालय, शिवडी, मुंबई हा सुनावणीकामी हजर राहत नसल्याने त्याचे विरोधात न्यायालयाने स्थित अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्यास ‘फरार’ घोषित केले आहे. सदर प्रकरणी रा.अ.कि. मार्ग, पो.ठाणे, पोलीस ठाणेस गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारावर, फरार आरोपी हा मु, हरदोली, ता. बबेरू, जिल्हा बांदा, राज्य उत्तर प्रदेश येथे असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला उत्तर प्रदेश राज्य येथून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे.
ॲन्टॉपहिल पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या 2012 कलम 307,452,324,323,1443,146,147,148,149 भादविसह 37(1) 135 मुपोकासह 4,25 या गुन्हयातील आरोपी कुप्पन मारीअप्पन देवेंद्र (वय 36 रा.इंदिरा नगर झोपडपट्टी, रविराजा ऑफीसच्या जवळ, टाटा पावर च्या खाली, सायन कोळीवाडा, मुंबई-३७ ) हा सुनावणी दरम्यान हजर राहत नसल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश, 30 नंबर न्यायालय, मुंबई यांनी त्यास नमुद गुन्हयात फरार घोषीत करून त्याच्या विरूध्द स्टॅन्डींग वांरट जारी केले होते. या प्रकरणी ॲन्टॉपहिल पोलीस ठाणे पोलीस ठाणेस गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीती च्या आधारावर, नमूद फरार आरोपी यांस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे.
पोलीस पथक विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, सत्यनारायण, सह पोलीस आयुक्त (का. व सु.), बृहन्मुंबई, अनिल पारस्कर, अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई, रागसुधा आर., पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली र.अ.कि. मार्ग, पोलीस ठाणे चे महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव व पथक, ॲन्टॉपहिल पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक अरफात सिध्दीकी व पथक यांनी केलेली आहे.