Kalyan Crime News : कल्याण पूर्वेला पुन्हा एकदा गोळीबार, जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज

•कल्याण पूर्वेला पुन्हा एकदा भर चौकात मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना
कल्याण :- जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची घटना कल्याण पूर्वेला समोर आली आहे. कल्याण पूर्वेच्या काटेमानिवली नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे या गोळीबारात एकाचा जागेस मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी फरार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात रंजीत दुबे नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. जमिनीच्या वादातून नातेवाईकांनीच गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांकडून संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास चालू आहे.
2 फेब्रुवारी 2024 रोजी भाजपाचे कल्याण पूर्वेचे तात्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आला होता. गणपत गायकवाड यांनी रागाच्या भरात महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना जखमी केले होते. तेव्हापासून आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहे.