Pune Robbery News : चोरीचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या सराईत चोर जेरबंद! तब्बल 50 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

Shivaji Nagar Police Arrested Robbers : आरोपीकडून गुन्हयात चोरी केलेला 17 लाख 7 हजारांचा मुदेमाल हास्तगत केला आहे. आरोपीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध चोऱ्या, पोलिसांकडून तब्बल 50 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
पुणे :- चोरीच्या अर्धशतक पूर्ण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.Pune Shivaji Nagar Police घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करून पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 50 ठिकाणी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहे.Pune Robbery Case आरोपीकडून 50 गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेला 17 लाख 07 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील भा. न्या. सं. कलम 305 (क),331 (4) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी हा म्हसोबा गेट बस स्टॉप, शिवाजीनगर पुणे येथे थांबलेला असुन त्याने ठिकठिकाणी चो-या केलेल्या आहेत. अशी खात्रीलायक बातमी पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना मिळाली होती.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना कळविली असता, त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून म्हसोबा गेट परिसरामध्ये त्याचा शोध घेवून ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपीला नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव हर्षद गुलाब पवार (वय 31 रा. गुलाबनगर घोटावडे फाटा, मुळशी जि. पुणे) असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याचे सॅक मध्ये सोने-चांदीचे दागिने मिळुन आले तसेच घरफोडी करण्याचे साहित्य मिळुन आले. त्यावर त्यास चौकशी करिता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येथे आणून त्याच्याकडे केले चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.तसेच,त्याने अजुन ब-याच ठिकाणी घरफोडी केल्याचे सागितल्याने त्यास गुन्ह्यामध्ये 4 फेब्रुवारी 2025 रोजी अटक करण्यात आली आहे.
कशाप्रकारे करत होता चोरी?
आरोपींकडे केले चौकशीमध्ये आरोपी हर्षद गुलाब पवार हा सन 2024 मध्ये जामिनावर सुटलेला असून त्याचेवर वेगवेगळ्या ठिकाणी 51 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे पोलीस सीसीटीव्ही चेक करुन आपल्या पर्यंत पोहचू नयेत यासाठी तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना सुमारे 40 ते 50 कि.मी. चा प्रवास करुन येवून घरफोडी करुन तसेच जाताना पुन्हा 40 ते 50 कि.मी. चा प्रवास छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून करुन जात असे. तसेच घरफोडी करुन जाताना व घरफोडी करण्यासाठी येताना स्वतःची ओळख लपविण्या साठी विविध जॅकेट, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत असे. त्यामधून जरी चुकून सिसिटीव्ही कॅमे-यामध्ये त्याची छबी आलीच तर पोलीसांचा तांत्रीक विश्लेषणातून तपास भरकटावा यासाठी मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची ॲक्टींग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच चोरलेले सोने-चांदीचे दागिने विकण्यासाठी सह आरोपी निलकंठ राऊत याची मदत घेत आहेत.
आरोपींकडून दाखल गुन्ह्यातील तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्याच्याअंतर्गत झालेल्या घरफोड्यातील व चोरीतील एकूण 236.63 ग्रॅम सोन्याचे दागिणे, 212 ग्रॅम चांदी, व घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेले कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, वेगवेगळ्या कुलपांच्या एकुण 49 चाव्या इत्यादी मिळून साधारण 17 लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.