IAS Transfer : आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचा धडाका पुन्हा एकदा, चार वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Officer Transfer :महायुती सरकारने बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटाच लावला आहे. तर काही दिवसापूर्वी 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई :- राज्यातील पुन्हा चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे. IAS Officer Transfer विधानसभा निवडणुकीला दर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मागील आठवड्यातच राज्य सरकारमधील 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. केवळ दीड महिन्यातच तब्बल 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहे.
2 जानेवारी 2025 रोजी 10 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. 4 फेब्रुवारी 2025 रोजी एकाचवेळी 13 IAS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर आज 11 फेब्रुवारी रोजी चार अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या झाल्या?
1.डॉ कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली जॉइंट सीईओ एमआयडीसी, मुंबई येथे करण्यात आली आहे.
2.डॉ मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली यांची जॉइंट एमडी सिडको नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
3.अशोक काकडे एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली करण्यात आली आहे.
4.अनमोल सागर सीईओ झेडपी लातूर यांची बदली मनपा आयुक्त भिवंडी निजामपूर बहुविध महामंडळात करण्यात आली आहे.