Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 94 किलो अंमली पदार्थ जप्त

Mumbai Devnar Police Seized 50 kG Ganja : मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-6 हद्दीतील देवनार पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये तब्बल 50 किलो 220 ग्रॅम 10.04 लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे.
मुंबई :- “नशा मुक्त गोवंडी” या अभियानअंतर्गत मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-6 Mumbai Police Unit 6 अंतर्गत देवनार,शिवाजीनगर, मानखुर्द आणि गोवंडी पोलीस ठाण्याच्या Govandi Police News हद्दीत हे अभियान राबविण्यात येत आहे.देवनार पोलिसांच्या कारवाईमध्ये तब्बल 50.220 किलो 10.04 लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. Mumbai Devnar Police Seized 50 kG Ganja गौतम नगर परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसातील दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. यापूर्वी केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी 44.494 किलो 9.74 लाखांचा गांजा जप्त केला होता.
देवनार पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक राजू साळुंखे आणि सहाय्यक पोलीस फौजदार कांबळे यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या घरात गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची गोपनीय बातमी मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी करून एकूण 50 किलो 220 ग्रॅम वजनाचे ज्याची किंमत दहा लाख 4 हजार 400 रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध एन डी पी एस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचे नाव शबाना शेहरे आलम शहा उर्फ शब्बो (32 वय, रा. गौतम नगर, केजीएन सोसायटी गोवंडी) आहे. तसेच तिचे दोन साथीदार इमरान सादिकअली शहा आणि जायदा बानी उर्फ झिल्ली इमरान शहा या दोघांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू साळुंखे करीत आहे. पोलिसांनी यापूर्वी देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 44 किलो 274 ग्रॅम वजनाचा गांजा ज्याची किंमत 9 लाख 74 हजार 28 रुपयाची जप्त केला आहे. पोलिसांनी दोन दिवसात केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 94 किलो 494 ग्रॅम वजनाचा गांजा ज्याची किंमत 19 लाख 78 हजार 428 रु. जप्त केला आहे.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, बृहन्मुंबई सत्य नारायण, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मुंबई, डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -6 , मुंबई, नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, देवनार विभाग, मुंबई आबुराव सोनावणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवनार पोलीस ठाणे, मुंबई बासित अली सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार अंबरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक राजू साळुंखे, अभिजित देशमुख, पोलीस फौजदार संतोष कांबळे, पोलीस हवालदार आंब्रे, पोलीस शिपाई तेजस देशमुख, विशाल पाटील, सोनावणे, सुर्यवंशी, पोलीस शिपाई प्रियंका माने, प्रिती पवार, मयूरी पाटील यांनी केली.