Mumbai Police: सैफ अली खान प्रकरणात मुंबई पोलिसांचा मोठा दावा, एका आरोपीची ओळख पटली, या कलमाखाली गुन्हा दाखल
Mumbai Police On Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानच्या घरात एका हल्लेखोराने घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई :- अभिनेता सैफ अली खानवर Saif Ali Khan झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा दावा केला आहे. Mumbai Police वांद्रे पोलीस ठाण्याच्या Bandra Police Station अधिकाऱ्याने सांगितले की, एका आरोपीची ओळख पटली आहे. चोरीच्या उद्देशाने आरोपी घुसले होते. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.अटकेनंतर अधिक तपशील शेअर केला जाईल, असे ते म्हणाले. पोलिसांनी सांगितले की, चोरीदरम्यान सैफ अली खानसोबत भांडण झाले होते.
सैफ अली खान राहत असलेल्या ठिकाणी आरोपी जिन्यांमधून बाराव्या मजल्यावर पोहोचला. फायरस्केप वापरला होता. त्याने चोरीचा प्रयत्न केला आणि सैफ अली खानवर हल्ला केला आणि तो फरार झाला.
मुंबई गुन्हे शाखेचे पथक प्रभादेवी परिसरात गस्त घालत आहे. संशयित हा मुंबईतील प्रभादेवी भागातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बुधवार मध्यरात्री 2.30 वाजता सैफवर हल्ला झाला. मुंबईतील वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.
वांद्रे पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 109 तसेच ट्रेस पासिंगसह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, त्याच्या शरीरावर अनेक ओरखडे आहेत. पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला दाखल करून आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.