Saif Ali Khan Attack News : मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, घरात घुसून केले 6 वार! रुग्णालयात दाखल*

Saif Ali Khan attacked with knife during burglary : सैफ अली खानवर चाकूने 6 वेळा हल्ला, अडीच तास शस्त्रक्रिया चालली, हल्ल्याच्या तपासासाठी पोलिसांनी 7 टीम तयार केल्या.
मुंबई :- सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात कोणीतरी अज्ञात इसम घुसला होता. Saif Ali Khan attacked with knife during burglary घरात प्रवेश केल्यानंतर त्याची सैफ अली खानच्या घरातील मदतनीस आणि अभिनेत्याशी बाचाबाची झाली. या हाणामारीत अभिनेता जखमी झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
त्यांनी सांगितले की, रात्री 2 वाजता सैफ अली खानच्या घरात घुसला होता. सैफ आणि अज्ञात व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली. सैफवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. सैफच्या मानेवर 10 सेमी जखम आहे. सैफच्या हाताला आणि पाठीलाही दुखापत झाली आहे. सैफ अली खानची शस्त्रक्रिया अडीच तास चालली.
सैफ अली खानच्या टीमने एक स्टेटमेंट जारी करून अभिनेता आता कसा आहे आणि काय झाले हे सांगितले आहे. टीमने सांगितले की, सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
मुंबई भाजप नेते राम कदम सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत ते म्हणाले – अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेणे पोलिसांची जबाबदारी आहे.