Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत भाजप नेते राम कदम यांचे मोठे वक्तव्य, ‘हे रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे…’

Ram Kadam On Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत भाजप नेते राम कदम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई :- अभिनेता सैफ अली खानवर Saif Ali Khan Attack झालेल्या हल्ल्याबाबत भाजप नेते राम कदम Ram Kadam यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतील घरात एका हल्लेखोराने घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले. पोलिसांनी गुरुवारी सकाळी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री उशिरा सैफच्या वांद्रे येथील निवासस्थानी ही घटना घडली, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. घटनेच्या वेळी अभिनेत्याच्या कुटुंबातील काही सदस्य घरात उपस्थित होते.
मुंबई पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सैफ अली खान चाकू हल्ल्यात जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू करण्यात आला आहे..