Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ! मंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Manoj Jarange Patil Latest News : मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी एका प्रचारसभेत ही वादग्रस्त टिप्पणी केली
लातूर :- अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे Manoj Jarange Patil यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलिस ठाण्यात पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केली आहे.मनोज जरांगे यांच्यावर एका प्रचारसभेत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक साहेबराव खंदारे यांनी सांगितले की, ही तक्रार मंत्र्यांचे समर्थक किशोर मुंडे यांनी केली आहे. फिर्यादीनुसार, जरांगे यांनी 4 जानेवारी रोजी परभणी येथे झालेल्या जाहीर सभेत धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्यामुळे समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या.तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 352 , 351 (2), (3) आणि कलम 3 (5) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा किनागाव पोलिस स्टेशनमध्ये 4 जानेवारी रोजी परभणीत सर्वपक्षीय निषेध रॅली काढण्यात आली.मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.