Thane Police News : “रेझिंग डे” निमित्ताने अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती मोहीम

Thane Police Latest News : “पोलीस स्थापना दिवस” औचित्य साधून ठाणे आयुक्तालयाच्या वतीने “रेझिंग डे” निमित्त जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये साडेतीन हजार विद्यार्थी आणि 700 शासकीय कर्मचारी सहभागी होते
ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने “रेझिंग डे” औचित्य साधून पोलीस स्थापना सप्ताह 2 जानेवारी ते 8 जानेवारी यादरम्यान राज्यभरातील पोलीस वेगवेगळ्या आयुक्तालयाकडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील एक सप्ताहापासून राज्यभरात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, तसेच जिल्हा मनोरुग्णालय, ठाणे व जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथील पारिचारीका व कर्मचारी वर्ग यांचे चर्चासत्र आयोजीत करण्यात आले होते. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश गावित यांनी अंमली पदार्थाच्या सेवनाचे होणारे दुष्परिणाम, त्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्या, व्यसनाधिनतेचे कुटुंबावर आणि संपूर्ण समाजावर होणारे विपरीत परिणाम याबाबत मार्गदर्शन केले तसेच काय उपाययोजना करता येतील याबाबत माहीती देऊन जनजागृती करण्यात आली कार्यक्रमादरम्यान एकुण सुमारे 3,500 विद्यार्थी व सुमारे 700 शासकीय कर्मचारी यांचे प्रबोधन करण्यात आले आहे.







रेझिंग डे निमित्ताने ठाणे-मुंब्रा परिसरातील सावर्जनिक गर्दीची ठिकाणे व रिक्षा स्टॅण्ड येथे उपस्थित जनसमुदायास अंमली पदार्थाच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम व उपाययोजना यासंदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
सन 2024 मध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थ सेवन करणारे व विक्री करणारे इसमांवर एकुण 4,078 गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण 4,333 आरोपींना अटक करण्यात आली असून एकुण 17 कोटी 42 लाख 54 हजार 536 रूपये इतक्या किंमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे संकल्पने प्रमाणे अंमली पदार्थ मुक्त व नशा मुक्त ठाणे शहर ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व समाजातील प्रत्येक नागरीकांनी हातभार लावण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
पोलीस उप आयुक्त, गुन्हे,अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल मस्के यांचे अधिपत्याखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, ठाणे शहर यांचे मार्फत करण्यात आले आहे.