Mawal Accident News : अवैध जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; चालकासह सहा जनावरे जखमी
Mumbai Pune Express Mawal Accident News : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर गहुंजे गावाजवळ अवैध जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे.या अपघातात वाहन चालकाचा वाहनातील काही जनावर ही जखमी झाले आहे
मावळ :- मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मार्गावरील मावळच्या गंहुजे गावाजवळील हद्दीत अवैध जनावरे घेऊन जाताना मुंबईकडे घेऊन जाणाऱ्या साखरेच्या ट्रकचा अपघात झाला आहे. Mumbai Pune Express Mawal Accident या अपघातात वाहन चालकासह वाहनातील जनावरांचाही जखमी झाले आहे. भरधाव वेगाने वाहन असल्याने नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मावळच्या गंहुजे गावाच्या हद्दीत मुंबईकडे साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकची देवनार येथील कत्तलखान्यात अवैधरित्या जनावर जी वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक झाली. यामध्ये जनावरे घेऊन जाणारा ट्रक चालक आणि त्यातील जनावरे जखमी झाले असून तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या जनावराच्या ट्रकमध्ये म्हशी असल्याची माहिती मिळत आहे.