Bollywood News : अभिनेत्री पूनम ढिल्लोनच्या घरात चोरी, चोरट्यांनी नेकलेस आणि कोट्यवधींची रोकड पळवली.

diamond necklace worth over a lakh was stolen from Bollywood actor Poonam Dhillon house : आरोपींनी पूनम ढिल्लो यांच्या घरातून हिऱ्याचा हार, 35 हजार रुपये रोख आणि काही अमेरिकन डॉलर्स चोरले. आता पोलिसांनी आरोपी समीर अन्सारीला अटक केली आहे.
मुंबई :- बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लो Poonam Dhillon हिच्या घरात चोरीची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली आहे. diamond necklace worth over a lakh was stolen from Bollywood actor मुंबईतील खार येथील पूनम ढिल्लन यांच्या घरातून अंदाजे 1 लाख रुपये किंमतीचा हिऱ्याचा हार, 35,000 रुपये रोख आणि काही अमेरिकन डॉलर्स चोरल्याप्रकरणी खार पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
ही अटक 6 जानेवारीला झाली. समीर अन्सारी असे अटक आरोपीचे नाव असून त्याचे वय 37 वर्षे आहे.अभिनेत्री मुख्यतः जुहूमध्ये राहते, तर तिचा मुलगा अनमोल खारच्या घरी राहतो आणि पूनम ढिल्लो कधीकधी खारच्या घरीही राहते.पोलिस तपासात निष्पन्न झाले की, आरोपी अन्सारी 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान फ्लॅट रंगविण्यासाठी अभिनेत्रीच्या घरी होता.
यावेळी त्याने उघड्या कपाटाचा फायदा घेत मौल्यवान वस्तू चोरल्या. अन्सारीने उघडे कपाट पाहिले आणि संधीचा फायदा घेत चोरी केली. आरोपींनी चोरीच्या काही पैशांची पार्टीही केली होती.