महाराष्ट्रMumbai

Mira Bhayandar Police : 49 व्या पोलीस क्रीडा स्पर्धेत मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस खेळाडूंचा दबदबा

Mira Bhayandar Police 49 Krida Competition: मिराबाई तर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील 154 पोलीस खेळाडूंनी घेतला सहभाग,बेस्ट ॲथलिट पुरुष- पोलीस अंमलदार शंभु साहेबराव सुपेकर हे ठरले मानकरी

मिरा रोड :– कोकण परिक्षेत्रीय 49 व्या पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय ,नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ,रायगड, ठाणे ग्रामिण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,पालघर या पोलीस घटकाकडील संघांनी समावेश घेतला होता. Mira Bhayandar Police मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे 154 पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता.नवी मुंबई आयुक्तालयाचे 191,ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे 111, रायगड पोलीस दलाचे 151, सिंधुदुर्ग पोलीस दलाचे 105, रत्नागिरी पोलीस दलाचे 65 व पालघर पोलीस दलाचे 140 असे एकुण 913 पोलीस खेळाडुंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.बेस्ट ॲथलिट पुरुष- पोलीस अंमलदार शंभु साहेबराव सुपेकर मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय, यांना मिळालेले आहे.जनरल चॅम्पीयनशिप पुरुष- मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाने 190 गुण प्राप्त करुन विजेतेपद मिळवले आहे.

28 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 यादरम्यान पालघर येथे आयोजित करण्यात आलेल्या 49 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये 913 पोलीस खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता.स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, वेटलिफ्टींग, पॉवर लिफ्टींग, कुस्ती, ज्युडो, तायक्वांडो, वु-शु, बॉक्सींग, हॉकी, फुटबॉल, हॅन्डबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी व जलतरण या खेळाचा समावेश होता. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पुरुषांच्या संघाने कबड्डी आणि हॅन्डबॉल या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून खोखो आणि व्हॉलीबॉल द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर महिलांच्या संघाने या स्पर्धेत खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला असून व्हॉलीबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, सुहास बावचे, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय), सोहेल शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त (मुख्यालय), यांनी सदर क्रिडा स्पर्धेसाठी वरिष्ठांनी खालील खेळाडु व प्रशिक्षक यांचे मनपुर्वक अभिनंदन केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0