Mumbai Crime News : मुंबईत 5.80 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, तीन ड्रग्ज तस्करी करणाऱ्याला अटक

•अमंली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई विभागीय युनिटला मिळाली व ते अंमली पदार्थ विविध भागात छापेमारी समोर आले. त्या आधारे टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा हाती लागला.
मुंबई:- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई युनिटने अलीकडील सर्वांत मोठी कारवाई केली असून त्यांनी 5.80 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. त्यामध्ये एम.डी(मेफेड्रॉन)108 आणि 5.59 किलो, उच्च प्रतीचे हायड्रोपोनिक वीड 2.040 किलो या प्रकारच्या अंमली पदार्थांचा समावेश आहे. आमले पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये साकी विहार रोड पवई, लोखंडवाला बॅक रोड,ओशिवारा आणि दादर कॅटरिंग कॉलेज मुंबई या ठिकाणी छापेमारी कोट्यावधी रुपयांचा अमले पदार्थ जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आयुक्त पदाचे सूत्र हाती घेतल्यापासून अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उभारला आहे.मुंबई विभागीय युनिटला मिळाली व ते अमली पदार्थ मुंबईच्या विविध भागात असल्याचे समोर आले. त्या आधारे टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा हाती लागला. आझाद मैदान युनिटने केलेला कारवाईत साकी विहार रोड पवई येथे गस्तीदरम्यान अवैधपणे एमडी (मेफेड्रॉन) विक्री करणार आहे एका व्यक्तीला अटक केली आहे. त्या व्यक्तीच्या ताब्यात 108 ग्रॅम वजनाचे एमडी ज्याची किंमत अंदाज आहे 21 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
दुसऱ्या कारवाईत लोखंडवाला बॅक रोड, येथे केलेल्या कारवाईमध्ये घाटकोपर युनिटने उच्च प्रतीचे हायड्रोपोनिक वीड विक्री करणार आहे. एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे तब्बल 2. 040 किलो हायड्रोपोनिक वीड ज्याचे अंदाजे किंमत दोन कोटी चार लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या तिसऱ्या कारवाईमध्ये दादरच्या कॅटरिंग कॉलेज परिसरात 3 किलो 550 ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे हायड्रोपोनिक वीड जप्त केले असून ज्याची अंदाजे किंमत 3 कोटी 55 लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ही कारवाई वरळी युनिटने केल्याचे सांगण्यात आले आहे.
अटक आरोपी हे लोखंडवाला, व दादर परिसरात हायड्रोपोनिक वीड या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन हायड्रोपोनिक वीड सेवनाचे प्रमाण उच्च शिक्षित तरूण पिढीमध्ये वाढत असल्याचे दिसून येते.
पोलीस पथक
देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई,सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले, वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.


