पनवेल जितिन शेट्टी : भागवत कथेला आज नवी मुंबईतील कामोठे Navi Mumbai Kamothe Jayramdas Yatra येथे भव्य कलश यात्रेने सुरुवात झाली. श्री गणाजी सामाजिक व धार्मिक कल्याण संस्थेच्या वतीने आयोजित या भागवत कथेच्या पूर्वसंध्येला आज कामोठे येथे भव्य कलश यात्रा काढण्यात आली. यामध्ये शेकडो महिला व धर्माभिमानी पारंपारिक वेशभूषा करून, नृत्य, गायन, कीर्तन करत सहभागी होऊन भाविकांना भागवत कथेत सहभागी होण्याचे आवाहन केले. 28 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या कथा महोत्सवात ललितांबा पीठाधीश्वर स्वामी श्री जयरामदासजी महाराज भगवंताची कथा मंत्रमुग्ध करणार आहेत.
यावेळी श्रीमद भागवत कथेचे आयोजक सुर्यमणी मिश्रा (गणाजी महाराज) व कार्यक्रमाचे अध्यक्ष के.डी.शुक्ल व इतर सहकाऱ्यांनी सांगितले की, कलियुगातील दु:ख दूर करून देवाची कथा हे शांती व सद्भावनेचे माध्यम आहे. सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय या भावनेने याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनी कामोठे आणि पनवेलकरांना कथा महायज्ञात सहकार्य करण्याचे आणि सनातन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.