Mumbai Local Train Update: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताना रेल्वेचा वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, अन्यथा मेगाब्लॉकमुळे रेल्वेने प्रवास होणार त्रासदायक!
मुंबई :- उद्या रविवारी 22 डिसेंबर रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. Mumbai Local Train हार्बर आणि मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर शनिवारी मध्यरात्री 12.30 ते रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असून, ब्लॉक वेळेत विरार / वसई रोड ते बोरिवली / भाईंदरदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. शनिवारी मध्यरात्री असलेल्या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वे कशाप्रकारे असणार मेगा ब्लॉक
स्थानक- ठाणे ते कल्याण मार्ग अप आणि डाउन जलद वेळ – सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 परिणाम ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यांमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावरील कशाप्रकारे असणार मेगा ब्लॉक
स्थानक- ठाणे/वाशी/ नेरूळ अप आणि डाउन वेळ – सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 परिणाम – सीएसएमटी ते वाशी / नेरूळ/पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे गोरेगाव दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल कुलां दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. बेलापूर-खारकोपर-उरण मार्गावरील लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
स्थानक- माहीम ते गोरेगाव हार्बर मार्गावरील मार्ग अप आणि डाउन धीमा वेळ – सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 परिणाम – ब्लॉक वेळेत चर्चगेट ते गोरेगाव, सीएसएमटी-वांद्रे, सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान मार्गावरील अप आणि धीम्या लोकल रद्द राहणार आहेत. ब्लॉकमुळे काही लोकल विलंबाने धावणार आहेत.