Police Inspector Suicide : CID पुणे येथे कार्यरत पोलीस निरिक्षकाची आत्महत्या : कौटूंबिक कारणाने केली आत्महत्या
पुणे, दि. 9 मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर)
गुन्हे अन्वेषण विभाग CID पुणे येथे कार्यरत एका पोलीस निरिक्षकाने बीड येथे रेल्वे खाली येत आत्महत्या केल्याने राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कौटूंबिक कारणाने आत्महत्या केल्याचे पत्र पोलीसांना घटना स्थळावर सापडले आहे.
पोलीस निरिक्षक सुभाष भिमराव दुधाळ, वय 42 वर्षे , पोलीस निरीक्षक EOW CID यांनी आत्महत्या केली आहे.
वरिष्ठ अधिकारी यांच्या नावाने समाज माध्यमांवर चुकीचे मॅसेज वायरल ….
दरम्यान वरिष्ठ अधिकारी यांच्या दबावाने दुधाळ यांनी आत्महत्या केल्याचे चुकीचे मॅसेज समाज माध्यमांवर वायरल करण्यात येत आहेत. घटना स्थळावरून दुधाळ यांच्या सहिनीशी तारीख व वेळ लिहून “मी कौटूंबिक कारणाने आत्महत्या करीत आहे” असे पत्र सापडले आहे. वरिष्ठ अधिकारी यांना बदनाम करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने मॅसेज वायरल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
कस्टोडियल डेथ तपास आणि कसूर…
दरम्यान एका कस्टोडियल डेथचा तपास करत असताना सपोनि यांच्या जोडीला एका पोलीस निरिक्षकाला गुंतवल्याने व तपास वरिष्ठांची परवानगी न घेता कोर्टासमोर सादर केल्याने त्यांच्यावर चौकशी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. याच दरम्यान त्यांना पुणे येथे हेडक्वार्टर नेमणूक देण्यात आली होती. १० दिवसांची रजा टाकून पोनि दूधाळ बीड येथे गेले होते. याच दरम्यान त्यांनी कौटूंबिक कारणाने आत्महत्या केली.
पोलीसांकडून कोणत्या कौटूंबिक कारणाने दुधाळ यांनी आत्महत्या केली याचा तपास केला जात आहे.