Mumbai Crime News : भाजीपाला व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक
मुंबई : फाय गार्डन (पाच उद्यान) परिसरात पहाटेच्या दरम्यान भाजी व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी केले अटक
मुंबई :- पहाटेच्या दरम्यान मुंबईच्या वडाळा परिसरात असलेल्या फाय गार्डन परिसरात भाजीपाला व्यवसायिकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील 25 हजार रुपये आणि एका व्यक्तीकडून पाच हजार रुपये बळजबरीने काढून घेणाऱ्या त्रिकुटाला माटुंगा पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या. याप्रकरणी भाजी व्यवसायिक सोमनाथ महादेव लोंढे यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली असून कलम 309(4),3(5), भा.न्या.सं 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली होती.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 4 यांच्या मार्गदर्शनाखाली माटुंगा आणि ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार पथक नेमण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्य पूर्वक तपासानंतर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते.अरबाज नासिर शेख उर्फ बाबुलाल, (वय 18,धंदा रस्त्यावर कपडा विक्री) महम्मद रफिक अस्लम सिद्दीकी, (वय 20 , धंदा- डिलीव्हरी बॉय ) फैजान हबिब जमादार, (वय 22 वर्षे, धंदा- मोबाईल कव्हर विक्रेता सर्व रा.ठि. ॲन्टॉपहिल, मुंबई) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी करण्याकरिता वापरलेली मोटरसायकल आणि सहा हजार रुपये रोख आणि चाकू असं मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का व सु) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, अनिल पारसकर, पोलीस, उप आयुक्त, परिमंडळ -4, रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त, माटुंगा विभाग योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माटुंगा पोलीस ठाणे राजेंद्र पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), प्रतिभा जोगळेकर यांचे मार्गदर्शनाखाली ॲन्टॉपहिल पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मदने, माटुंगा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक माळी, पोलीस उपनिरीक्षक निकीता नारणे, पोलीस हवालदार घुगे, निकम, पोलीस शिपाई घाडगे, देशमाने, मेटकर, तोडासे, उंडे,आमदें, सजगणे, साळुंखे यांनी यशस्वीपणे पुर्ण केली आहे.