Virar Crime News : ATM फोडण्याच्या प्रयत्नात गुन्हेगार अपयशी – 24 तासांत पोलिसांकडून अटक

- स्टेट बँकेच्या एटीएम मशिनला कटरने नुकसान करून चोरीचा प्रयत्न, दोन्ही आरोपी शिताफीने पकडले; कटावणी, ब्लोटॉर्च, ग्राइंडरसह साहित्य जप्त
विरार :- विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांना अवघ्या 24 तासांत अटक करण्यात बोळींज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या चोरट्यांनी कटर, ब्लोटॉर्च, मास्क, ग्लोज आदी साहित्य वापरून एटीएममधील रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला होता.
कटर, ब्लोटॉर्च, ग्राइंडर घेऊन ATM तोडण्याचा प्रयत्न
दि. 14 जुलै 2025 रोजी रात्रीच्या सुमारास, शॉप नं. 55, जे अॅव्हेन्यू, ग्लोबल सिटी, विरार पश्चिम येथील SBI च्या ATM मशिनला कटर व हत्यारांच्या साह्याने तोडण्याचा प्रयत्न दोन अज्ञात इसमांनी केला.
या प्रकरणी सागर पाटील (रा. दहिसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बोळिंज पोलीस ठाण्यात अन्वये भा.दं.सं. 2023 चे कलम 305, 62, 3(5) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
आरोपींचा शिताफीने छडा, चोरीच्या साहित्याची जप्ती
गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर पोलिसांनी एकाच दिवशी तपासाचा वेग वाढवून,
अजय विजय यादव (वय 45, रा. रचना टॉवर, ग्लोबल सिटी, विरार),भरत गजानन सनके (वय 37 रा. आशेळे गाव, उल्हासनगर) या दोघांना अटक केली. आरोपींकडून चोरीसाठी वापरलेले खालील 13,850 रुपयांचे साहित्य हस्तगत करण्यात आले:,ग्राईंडर मशिन,कटावणी,गैस ब्लोटॉर्च,ब्लेड्स, ग्लोज, मास्क, बॅग,रेनकोट इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी
सदर कारवाई निकेत कौशिक (पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि.),
दत्तात्रय शिंदे (अपर पोलीस आयुक्त),
सुहास बावचे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
प्रमुख अधिकारी व कर्मचारी
प्रकाश कावळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,प्रकाश सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, विष्णू वाघमोडे, सहाय्यक फौजदार जनार्दन मते, किशोर धनु, पोहवा रोशन पुरकर, प्रफुल सरगर, संदीप शेळके, सुखराम गडाख सागर देशमुख, पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पोलीस अंमलदार सोहेल शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.




