क्राईम न्यूजमुंबई
Trending

Kalyan Flipkart Robbery News : फ्लिप कार्डच्याहब मधून लॅपटॉप, मोबाईल करायचा लंपास, चार आरोपींना अटक

Kalyan Flipkart Hub Robbery News : फ्लिपकार्डच्या हब मधून ‌लॅपटॉप, मोबाईल करायचा लंपास; 2 लॅपटॉप, 23 मोबाईल,1 कॅमेरासह आरोपी ताब्‍यात

कल्याण :- फ्लिपकार्डवरून ऑनलाईन वस्तू मागवण्याचा प्रमाणात सातत्याने वाढ होत असते. ई-कॉमर्सच्या माध्यमातून लोकांना घरबसल्या वस्तू ऑनलाईन भेटतात. Kalyan Flipkart Hub Robbery गड्डी पासून ते बडी पर्यंत सर्वच वस्तू ऑनलाईन भेटल्यामुळे ग्राहकांना बाजारपेठ जाण्याची आता वेळ गेलेली आहे एका क्लिकवर वस्तू आपल्या दारात डिलिव्हरी बॉय मार्फत मिळाली जाते. परंतु फ्लिपकार्डच्या हबवरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरट्यांनी 23 मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, एक कॅनन कंपनीचा कॅमेरा इलेक्ट्रॉनिक फॅन एअर बर्ड्स असा जवळपास सहा लाख 63 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता. Kalyan Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखा घटक-3 घटकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, काही व्यक्ती चोरीचे मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर वस्तु विक्री करण्यासाठी येणार आहेत. बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा, घटक-3 कल्याण येथील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी खंबाळपाडा रोड, डोंबिवली पूर्व येथे सापळा लावुन सशंयीत प्रणव रविंद्र पांचाळ (वय 25 रा. मानपाडा डोंबिवली पूर्व) प्रंशात गंगाराम शेलार (वय 25 रा. म्हारळ गाव उल्हासनगर) अमित भिमराव राणे (वय 30 रा. तिसगाव, कल्याण पुर्व) अजित भिमराव राणे (वय 28 रा. तिसगाव, कल्याण पुर्व) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे वेगवेगळ्या चार बॉक्स मध्ये मिळुन आलेल्या मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर वस्तु बाबत विचारपुस केली असता त्यांनी माहिती दिली की, मागील तीन महिन्यात वेळोवेळी चक्की नाका, कोळशेवाडी परिसरातील अमेय हॉस्पीटल समोरील फ्लिप कार्डच्या हबमथुन सदर मोबाईल फोन, लॅपटॉप चोरी केले असल्याचे सांगितले. संशयीत व्यक्तींच्या ताब्यात मिळून आलेल्या मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर वस्तु बाबत परिमंडळ-3 कल्याण मधील पोलीस ठाणेकडे खात्री केली असता कोळशेवाडी पोलीस ठाणे Kolshewadi Police Station गुन्हा बी.एन.एस 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. Kalyan Latest Crime News

पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, (शोध 1) गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 3, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस अमंलदार विलास कडु, दिपक महाजन, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, सतिश सोनावणे, यांनी केलेली आहे. Kalyan Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0