क्राईम न्यूजमुंबई
Trending

Bhayandar Robbery News : चोरट्याने 20.10 लाखांचे सोन्याचे बिस्कीट चोरले, भाईंदर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपींना अटक

Bhayandar Police Arrested Robbers : भाईंदर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पोलिसांचे कामगिरी, दोन आरोपींना अटक

भाईंदर :- फिर्यादी बाळकृष्ण भागोजी अबगुल, (61 वय, रा. महावीर कृपा, विनायकनगर, मोरगांव, नालासोपारा पूर्व) हे त्यांचे बॅगमधुन अंदाजे 25 लाख रुपये किमंतीचे 375.180 ग्रॅम सोन्याची बिस्कीट भाईंदर पश्चिम येथील अभयभाई जैन यांचे रुचीना अकॅडमी स्कूल मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या फॅक्टरीतुन चोरून भाईदर स्टेशनकडे 26 नोव्हेंबर दुपारच्या दरम्यान घेवून जात असतांना अशोकराज टिकी शोरुम या दुकाना समोर अनोळखी आरोपींनी आपसात संगणमत करुन, फिर्यादी पांचेकडील बॅग हिसकावून, बॅगेतील सोन्याची बिस्कीट असलेली पुडी काढून घेवुन रिक्षाने पळुन गेल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दिली होती. Bhayandar Police Station भारतीय न्याय संहिता कलम 304, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Bhayandar Robbery News

भाईंदर पोलीस ठाण्याचे प्रकटीकरण शाखेचे व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे व पथकाने यांनी गुन्हयाचे तपास करण्यासाठी घटनास्थळ तसेच परीसरातील, ठाणे परीसरातील सीसीटीव्ही तपासणी करुन, आरोपींचे मोबाईल नंबर मिळवुन, आरोपीचे नांव निष्पन्न करुन, मोबाईल सीडीआर विश्लेषण करुन, गुन्हयातील आरोपी सुनिल निवा पाटील, (वय 56 वर्ष, रा.आदर्शनगर, वर्तकनगर, जिल्हा ठाणे) यांचा कसोशीने व शिताफीने माग काढून, त्यास भडगांव जिल्हा जळगांव येथुन ताव्यात घेवुन अटक केली आहे. त्याचा साथीदार रामानंद छोटेलाल यादव, (वय 46 वर्ष, रा.गणेश मंदीराचे जवळ, नेवाळी, ता. कल्याण, जि. ठाणे) यांस देखील ठाणे येथे सापळा रचून अटक करुन, गुन्हा उघडकीस आणला आहे. पुण्यातील आरोपी सुनील पाटील यांच्या विरोधात नारपोली, नवघर,वर्तक नगर या ठिकाणी पाच गुन्हे असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून आरोपींना 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. तसेच आरोपींच्या ताब्यातील 301.70 ग्रॅम 20.10 लाखांचे सोन्याचे बिस्किट जप्त केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कातुरे हे करीत आहे.

पोलीस पथक
मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांचे मार्गदर्शनाखाली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे महेंद्र निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोचले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन जाधव, पोलीस हवालदार रविंद्र भालेराव,राजेश श्रीवास्तव, सुशिल पवार, के. पी. पवार, के. आर. पवार, पोलीस नाईक रामनाथ शिंदे, पोलीस अंमलदार राहुल काटकर, विशाल भोई, संजय चव्हाण यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0