क्राईम न्यूजमुंबई
Trending

Share Market Fraud : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक! सायबर विभागाच्या NCCRP Portal तक्रार फसवणुकीतील पैसे परत

Nalasopara Cyber Police Arrested Share Market Fraudster : सायबर पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरी ; शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूकीत हडप झालेली रक्कम सायबर पोलिसांकडून परत

नालासोपारा :- शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग Share Market Trading खाते उघडून पैसे गुंतविल्यास कमी दिवसांत चांगला परतावा मिळेल, असे आमिष सायबर गुन्हेगारांकडून लोकांना दाखविले जात आहे. सुरवातीला थोड्या रकमेचा परतावा लगेचच दिला जातो, जेणेकरून समोरील व्यक्ती विश्वास ठेवून जास्त पैसे गुंतविण्यास तयार होईल.मात्र, मोठी रक्कम हाती लागल्यानंतर सायबर गुन्हेगार ना मुद्दल ना जादा परतावा देतात अशी वस्तुस्थिती आहे. अशीच रक्कम फसवणूक झालेल्या नवघर पोलीस ठाण्याच्या Navghar Police Station हद्दीत राहणाऱ्या जोशी यांनी सायबर विभागाच्या Cyber Crime Branch NCCRP Portal येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर सायबर विभागाच्या पोलिसांनी त्वरित ती रक्कम परत मिळवून देण्यास यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार आहे जोशी यांना मोबाईलवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत एक कॉल आला होता. KOTAK SECURITY AND SBI CAP SECURITY शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळेल या आमिषाला बळी पडत जोशी यांनी त्या आर्थिक गुंतवणूक केली होती. परंतु गुंतवणूक केलेल्या रक्कमेपैकी कोणत्याही प्रकारे परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली असे लक्षात येतात बुरमान यांनी सायबर पोलिसांच्या NCCRP Portal वर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारदार यांनी वेळोवेळी केलेले आर्थिक व्यवहाराची तपासणी करून सर्व रक्कम पोलिसांना गोठाविण्यात आली. पोलिसांनी बँकेची आणि न्यायालयाची पत्रव्यवहार करून फसवणुकीतील रक्कम बुरमान यांच्या मूळ खात्यावर परत मिळवून देण्यात यश आले आहे. पोलिसांना फसवणुकीतील 4 लाख 49 हजार 578 रुपयांची रक्कम जोशी यांच्या खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0