महाराष्ट्र

Panvel News: ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पनवेलमध्ये महामानवास करण्यात आले अभिवादन

पनवेल जितिन शेट्टी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल मतदार संघाचे आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितिन पाटील, मागासवर्गीय समाजाचे नेते ऍड प्रकाश बिनेदार यांच्यासह भीम अनुयायी उपस्थित होते. महापरिनिर्माणदिनाच्या पार्श्वभूमीवरती पनवेल महापालिकेच्यावतीने पुतळापरिसराची स्वच्छता करण्यात आली होती. तसेच मंडप घालून सुशोभिकरण करण्यात आले आहे. याबरोबरच पनवेल, खारघर, कामोठे याठिकाणहून दादरला, चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांसाठी चहा, पाणी आणि बिस्किटे यांची सोय महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0