Mumbai Crime News : मुंबई खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई, बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तीन आरोपी गजाआड
Mumbai Crime News : मुंबई खंडणी विरोधी कक्ष, गुन्हे शाखेची मोठी कारवाई करत 3 आरोपींना मोठ्या प्रमाणावर बंदूक आणि काडतुसे विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या
मुंबई :- मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्ष, गुन्हे शाखा Mumbai Crime Branch यांनी मोठी कारवाई करत बंदुका आणि काडतुसे विक्रीसाठी आलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे.पायधुनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 2 पिस्टल,1 रिव्हॉलवर,3 गावठी कट्टे आणि 67 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे Muदाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, पायधुनी परिसरात प्रभू हॉटेल जवळ 3 व्यक्ती बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अमोल रामचंद्र तोडकर,मुंबई खंडणी विरोधी पथक यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकांने सापळा रचून 3 आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींकडून पोलिसांना 2 पिस्टल, 1 रिव्हॉल्व्हर, 3 गावठी बनावटीचे कट्ट्यांसोबत 67 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अभिषेक कुमार पटेल (वय 26 ), सिद्धार्थ सुभोध कुमार गोलू (वय 23 ) आणि रचित रमशिषकुमार मंडळ (वय 27 ) अशी अटक आरोपींची नावं आहेत.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डी (विशेष) किशोरकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, सुनिल पवार, अरुण थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती कदम, जालिंद लेंभे, मालमत्ता कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहाय्यक फौजदार संदीप ब्रिद, पोलीस हवालदार संतोष सुर्वे,विजय थोरात, निलेश कंद, मुळे,रोहन सुर्वे,तोडकर,धादवड, पोलीस शिपाई राजाराम मोटे,जमील शेख, कोळी, पोलीस हवालदार सुशिल साळुंखे व विशेष पथकातील हरिष दलाल, शेखर पाटील, वी राठोड, पोलीस शिपाई संतोष वायाळ, उत्कृष्ठ कदम यांनी पार पाडलेली आहे.