Mahatma Phule Death anniversary : क्रांतिकारक विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे. 28 नोव्हेंबर 1890 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
Mahatma Phule Death anniversary : महात्मा ज्योतिबा फुले हे विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचं निर्मूलन, स्त्रियांना आणि मागासवर्गीयांना शिक्षण देणं अशी समाजहिताची अनेक कार्य करणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज (28 नोव्हेंबर) पुण्यतिथी आहे. दरम्यान, महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक कट्टरता, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीशिक्षण या कार्यासाठी वाहून घेतले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुण्यात त्यांचं निधन झालं.
फुलेंवर लिहिलेली पुस्तके
महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे
महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे
महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर
महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं.बा. सरदार
महात्मा फुले समग्र वाङ्मय – संपादक धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी
युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार
युगार्त (जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरी, लेखक – बाळ लक्ष्मण भारस्कर)
महात्मा जोतीराव फुले – नजरीयात और ऊन का अदब.सरसरी जायजा,(ऊर्दू) लेखिका – डाॅ.नसरीन रमझान सैय्यद (पुणे)
महात्मा फुलेंचे कार्य : शोध आणि बोध — संपादक ..प्रा.डॉ. नरसिंग कदम ( उदगीर )
महात्मा फुले : साहित्य आणि विचार संपादक प्रा.डॉ. नरसिंग अप्पासाहेब कदम