Vasai News : वसई विरार महानगरपालिकेच्या डी प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पोलिसांकडून मनाई आदेश लागू
Vasai Latest News : पोलीस उप आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्याकडून वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती डी आचोळो परिसरात कलम 163, मनाई आदेश लागू करण्यात आले
नालासोपारा :- शहरातील अनधिकृत बांधकाम जमीनदस्त करण्याकरिता वसई-विरार महानगरपालिकेच्या Vasai Virar BMC प्रभाग समिती डी आचोळो येथे मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्याकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. 27 नोव्हेंबरच्या मध्यरात्री म्हणजेच रात्री 12 वाजल्यापासून 28 नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
वसई विरार महानगरपालिकेच्या डी प्रभाग क्षेत्र असलेल्या सर्वे नंबर 22 ते 34 व 83 म्हणजेच विजय लक्ष्मी नगर, वसंत नगरी,नालासोपारा पूर्व येथील जागेवर महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड व मलजल प्रक्रिया केंद्र (STP) साठी आरक्षित असलेला भूखंडावर अनधिकृत बांधकाम झाल्याने याबाबत महानगरपालिकेकडून उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हातोडा फिरवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना स्थानिक रहिवाशांचा, राजकीय पक्ष, संघटना यांच्याकडून कोणत्याही विरोध होऊ नये किंवा कामकाजात अडथळा येऊ नये याकरिता या परिसरात पोलिसांनी कलम 163 प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.