Nana Patole : नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे का? मी अद्याप राजीनामा….
Nana Patole to resign : नाना पटोले यांच्याबाबत अनेक प्रसारमाध्यमांतून त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आला होता., नाना पटोले दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घेणार भेटीला
ANI :- महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी पदाचा राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्यक्षात त्यांच्या राजीनाम्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली होती. त्यावर त्यांनी चित्र स्पष्ट केले आहे. पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी नाना पटोले दिल्लीत आले होते. प्रसारमाध्यमांनी त्यांना राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “मी फक्त अध्यक्षांना भेटायला जात आहे, मी कोणताही राजीनामा सादर केलेला नाही. तुम्हाला कोणी सांगितले?”असा प्रश्न नाना पटले यांनी माध्यमांना विचारला आहे. काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीच्या पराभवानंतर नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या मागील दोन दिवसांपासून माध्यमांवर फिरत असताना नाना पटोले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
साकोली मतदारसंघातून नाना पटोले विजयी झाले. मात्र, त्यांच्या विजयाचे अंतर खूपच कमी होते. त्यांना केवळ 208 मतांनी यश मिळाले. पटोले यांना एकूण 96795 मते मिळाली. भाजपचे अविनाश ब्राह्मणकर 96587 मते घेऊन दुसऱ्या स्थानावर आहेत.288 जागा असलेल्या महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी खराब होती. पक्षाला केवळ 16 जागा मिळाल्या. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला.