Mira Road Crime News : पॅरोल रजेवरुन सात वर्षापासून फरार असलेला आरोपी पोलिसांनी केले अटक
खुनाच्या गुन्हयामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना पॅरोल रजेवरुन 2017 पासुन पळुन गेलेल्या आरोपीस 7 वर्षांनी अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा यांना यश
मिरा रोड :- पॅरोलवर बाहेर आलेला आरोपी सात वर्षापासून फरार होता पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.काशिमीरा पोलीस ठाणे गुन्हा भा.दं. वि. सं. कलम 302,452,504अन्वये दाखल गुन्ह्या मध्ये मा. ठाणे न्यायालयाने आरोपीत यकीनअली नासीरअली शेख (36 वर्षे), मिरारोड पूर्व यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर आरोपीत हा कळंबा मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे शिक्षा भोगत असताना तो सन 2017 मध्ये अभिवचन रजेवर सुटलेला होता. अभिवचन रजा संपल्यानंतर दिनांक 18 फेब्रुवारी 2017 रोजी 05.00 वाजता कळंबा कारागृह, कोल्हापूर येथे रजेवरून हजर होणे असतांना देखील तो कोल्हापुर कळंबा कारागृहात हजर न होता पळून गेलेला होता. त्याचे विरुद्ध पोलीस शिपाई राजू नारायण शिंदे नेमणूक कळंबा कारामूह जिल्हा कोल्हापूर यांनी दिले फिर्यादी वरुन काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा भादवीस कलम 224 प्रमाणे 27 फेब्रुवारी 2017 रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. Mira Road Crime News
पोलीस आयुक्त , अपर पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी मिरा भाईंवर वसई विरार पोलीस आयुक्तालयात क्षेत्रात गुन्हयातील पाहीजे य फरारी आरोपीताचा शोध घेवून अटक करण्याचाचत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष 01, काशिमिरा मार्फत तपास करीत असताना पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा यांना मिळालेल्या माहीतीप्रमाणे तपास करण्यात आला. सदर गुन्हयांतील फरारी आरोपी यकीनअली नासीरअली शेख याची माहीती काढून त्याचा शोध Mira Road Crime News
घेत असताना सदर आरोपी आज ( 7 मार्च 2024) रोजी मिळून आलेला आहे. त्यास त्याचे नांव विचारता त्याने आपले नांव यकीनअली नासोर अली शेख (46 वर्षे,) दहिसर पूर्व, येथून आरोपी यास ताब्यात घेवून त्यास पुढील कायदेशीर कारवाईकामी काशिमीरा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेले आहे. Mira Road Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सारे, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष 1 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, सहाय्यक फौजदार संदीप शिवे, पोलीस हवालदार संतोष लांडगे, पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा, सचिन हुले, सचिन सावंत, विजय गायकवाड, समिर यादव, सुधीर खोत, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, पोलीस शिपाई गौरव बारी सौरभ इंगळे, किरण आसवले, सहाय्यक पोलीस फौजदार, सतोष चव्हाण सायबर विभाग यांनी केली आहे. Mira Road Crime News