महाराष्ट्र
Trending

Kalyan Police : कल्याणमध्ये रिक्षेत विसरलेला 2.10 लाखांचे सोन्याचे दागिने महिला प्रवाशाला परत

Kalyan Police Latest News : कल्याण पश्चिमेतील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारात रिक्षेतून येत असताना एका महिला प्रवाशाची सोन्याचे दागिने 2.10 लाखांचा ऐवज असलेली डब्बा प्रवासादरम्यान रिक्षेत विसरली.

कल्याण :- गावावरुन येथून कल्याण पश्चिमेतील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगार उतरले त्यानंतर कल्याण पूर्वेच्या मेट्रो मॉल परिसरात जात असताना महिला प्रवाशाची सोन्याचे दागिने ज्याची किंमत दोन लाख दहा हजार रुपये ऐवज असलेली डब्बा रिक्षेत विसरली. महात्मा फुले पोलिसांनी Mahatma Phule Police बारा दिवसात सलग तपास करून संबंधित रिक्षेचा शोध घेऊन संबंधित महिला प्रवाशाला दागिनेचा ऐवजा परत केला आहे. Kalyan Police Latest News

शुभांगी अरुण पराड ‌(24 वय) यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन घडला प्रकार सांगितला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल भुजबळ आणि अंमलदार यांच्या पथकाने महिलेने प्रवास केलेल्या कल्याण बस स्थानकापासून ते मेट्रो मॉल परिसरातील सर्व सीसीटीव्ही चित्रण तपासले. बारा दिवस ही पाहणी सुरू होती. या पाहणीनंतर सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिसांनी संबंधित रिक्षा वाहन क्रमांकाच्या आधारे त्या रिक्षा चालकाचा शोध घेतला. त्यांच्या रिक्षेत महिला प्रवासी विसरलेली डब्बा ताब्यात घेतला. पिशवीतील ऐवजाला कोणीही हात लावला नव्हता. तक्रारदार शुभांगी पराड यांना त्यांची सोन्याचा ऐवज असलेली पिशवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांच्या हस्ते परत करण्यात आली. Kalyan Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0