blast in Jalgaon : जळगावात महामार्गावर रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडर फुटला. व्हिडिओ व्हायरल
fire in running ambulance and oxygen cylinder blast in Jalgaon : जळगावातील दादा वाडी परिसरात उड्डाणपुलावर जाणाऱ्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. या अपघातात रुग्णवाहिका चालक, गर्भवती महिला आणि तिचे कुटुंबीय सुखरूप आहेत
जळगाव :- एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव शहराजवळील महामार्गावर बुधवारी (13 नोव्हेंबर) रात्री सुमारास एका रुग्णवाहिकेला आग लागली. त्यात बसवलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचाही स्फोट झाला. bulance and oxygen cylinder blast स्फोटाच्या काही मिनिटे आधी चालकाने आपल्या बुद्धीने गर्भवती महिला आणि तिच्या कुटुंबीयांना बाहेर काढलं होते, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले होते.
एरंडोल शासकीय रुग्णालयातून एका गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेतून जळगाव जिल्हा रुग्णालयात आणले जात होते. यावेळी इंजिनमधून धूर निघत असल्याचे रुग्णवाहिका चालकाला दिसल्याने तो तात्काळ रुग्णवाहिकेतून बाहेर आला व त्यानंतर गर्भवती महिला व तिच्या कुटुंबीयांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढून काही ठिकाणी सुरक्षित स्थळी नेले.
रुग्णवाहिकेच्या इंजिनला आग लागली. संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी आल्यानंतर काही मिनिटांतच आग रुग्णवाहिकेच्या ऑक्सिजन टाकीत पसरली. यानंतर ऑक्सिजन सिलेंडरचाही स्फोट झाला. या स्फोटाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आगीचा फुगा अनेक फूट वर जात असल्याचे पाहायला मिळत आहे.स्फोट एवढा जोरदार होता की आजूबाजूच्या काही घरांच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.