Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने बॅगेची केली तपासणी
Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरे, अमोल कोल्हे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची ही हेलिकॉप्टरची तपासणी केली आहे
मुंबई :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या बॅगांची तपासणी करण्याच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar Bag Cheked यांच्याही बॅगा व हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या तपासणीत अधिकाऱ्यांच्या हाती एका बॅगेत चकल्या लागल्या. अजित पवारांनी त्या त्यांना खाण्याची सूचना केली. यावेळी उपस्थितांत एकच हशा पिकला. दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने Election Commission Flying Squad बॅगा तपासल्या, त्यानंतर खासदार अमोल कोल्हे,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यसेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर अजित पवार यांचे बॅग तपासण्यात आले आहे
उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची यवतमाळ व लातूरमध्ये तपासणी करण्यात आली होती. या मुद्यावरून त्यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली होती. निवडणूक आयोगाने केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याच बॅगांची तपासणी करू नये. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महायुतीच्या सर्वच नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्याची मागणी केली. विशेषतः त्यांनी ही तपासणी केली नाही तर आमचे शिवसैनिकच अशी तपासणी करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अजित पवारांच्या सामानात एक डब्बाही निघाला. त्यांनी तो डब्बाही अधिकाऱ्यांना तपासण्याची सूचना केली. यावेळी ते अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतानाही दिसून आले. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ अजित पवार यांनी ट्विट केला आहे. मी निवडणूक प्रचाराला जात असताना निवडणूक आयोगाने माझी बॅग व हेलिकॉप्टरची नियमित तपासणी केली. मी त्यांना पूर्ण सहकार्य केले. माझ्या मते, स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी अशा उपाययोजना आवश्यक आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी कायद्याचा आदर करत आपल्या लोकशाहीची अखंडता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांना सहकार्य करू या, असे अजित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.